।। श्री स्वामी समर्थ ।।

0
।। श्री स्वामी समर्थ ।।



सर्वांनी "देऊळ बंद" चित्रपट बघितलाच असेल

पण त्यातून घेतलं काय ???



चला स्वामींनी उच्चारलेले मानवी जीवन सुखकर करणारे काही अमृततुल्य वाक्यांवर नजर टाकुया..


1) चुकून या पादुका खाली ठेवल्याना तर दर्शनाच्या रांगा लागतील तुझ्या विज्ञानाच्या.

2) सिग्नल तोडणा-या व्यक्तीने दिवसातून 4 - 4 वेळा माझ्या आरत्या केल्या तरी मी त्याच्या पाठीशी उभा राहत नाही. पण जो प्रमाणिक आहे भले तो नास्तिक असेल मला मानत नसेल तरी मी त्याच्या पाठीशी सदैव उभा असतो. म्हणूनच म्हंटलंय सिग्नल पाळ मी तुझ्या पाठीशी आहे.

3) रोज पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणार दिवा मीच लावलाय.

4) तुझी नास्तिकता ही तुझ्या तिरस्कारातुन निर्माण झाली आहे.

5) मी कुणाच्या मागे लागत नाही ; पाठीशी उभा राहतो.

6) जन्म आणि मृत्युच्या फे-यात ढवळाढवळ करण्याचा अधिकार मलाही नाही.

7) माणसाचं शरीर म्हणजे चुंबक आहे आणि ते फक्त दक्षिण उत्तर स्थिर राहतं दक्षिणेकडे पाय करुन झोपल्यास रक्तप्रवाह उलट होतो म्हणून आमचं अध्यात्म सांगतं मेलेल्याचे पाय दक्षिणेकडे ठेवावे जिवंत माणसाचे नाही.

8) तुझी बुद्धी तू या देशाच्या संरक्षणासाठी वापरतोय म्हणून मी तुला दिसतोय.

9) परमेश्वर ही बघण्याची नाही जाणुन घेण्याची गोष्ट आहे.

10) तुझं विज्ञान हे जग कसं निर्माण झालं ते सांगत असेल तर माझं अध्यात्म हे जग का निर्माण झालं हे सांगतं.

11) असे देऊळ लुटणारे, देऊळ बंद करणारे लाखो लोक या देशात आले आणि गेले ... पण देव होते देव आहे आणि देव राहणारच.

12) सेवा करा सेवेकारी व्हा माणूस जपा माणूस शिका कारण परमेश्वर हा माणसांतच आहे.


तथास्तु.