ताकाचे फायदे

2
ताकाचे  फायदे



  • उन्हाळ्यात जीरपूडसोबत ताकाचे सेवन केल्याने पचन क्रिया व्यवस्थित राहते.
 

  • वजन कमी करण्यासाठी ताकात काळं मीठ मिसळून पिण्याने फायदा होतो. 
 
  • उच्च रक्तदाब असल्यास गिलोय (अमृत वल्ली) चूर्ण ताकासोबत सेवन केले पाहिजे.
सकाळ- संध्याकाळ ताक पिण्याने स्मरण शक्ती वाढते.
 
  • वारंवार उचकी येत असल्यास ताकात एक चमचा सुंठ चूर्ण मिसळून सेवन केले पाहिजे. 



  • मळमळणे, उलटी येणे असे लक्षण असल्यास ताकात जायफळ उगाळून पिण्याने फायदा होतो.



  • सौंदर्य समस्यांसाठी ताक हे फायद्याचे आहे. ताकात आटा मिसळून तयार केलेलं लेप त्वचेवर लावल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात.



 

  • गुलाबाचे रूट दळून ताकात मिसळून तयार केलेला लेप चेहर्‍यावर लावल्याने पिंपल्स नाहीसे होतात.



  • जर आपण अती ताण सहन करत असला तर नियमित ताकाचे सेवन करणे आपल्यासाठी योग्य राहील. याने शरीरासह डोक्यातील उष्णातही कमी होते.




  • शरीराचा एखादा भाग जळल्यावर लगेच लावल्याने फायदा होतो.





  • खाज सुटत असल्यास अमलतासाचे पान पिसून ताकात मिसळून त्याचा लेप शरीरावर लावा. काही वेळाने स्नान करा. खाजेपासून मुक्ती मिळेल.

  • विष सेवन केलेल्याला वारंवार फिकट ताक पाजल्याने लाभ होतो. विषारी किड्याने चावल्यास ताकात तंबाखू मिसळून लावल्याने आराम होतो. तरी डॉक्टराची सल्ला घेणे योग्य.




  • टाचा फाटल्यास ताक काढण्यावर निघणारं लोणी लावायला हवं.